आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणने वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाइल अॅप, नेटबँकिंग आदी सेवा उपलब्ध करून दिल्या तरी फक्त ४६.२९ टक्के ग्राहकच ऑनलाइन वीज बिले भरत असल्याचे दिव्य मराठीला मिळालेल्या आकडेवारीतून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, यात औरंगाबाद प्रादेशिक विभाग राज्यात सर्वात मागे असून येथील फक्त ९ लाख २३ हजार म्हणजे ४२.२९ टक्के ग्राहक ऑनलाइन वीज बिले भरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन वीज बिलांच्या नावाने झालेल्या फसवणुकीमुळे येथील वीज ग्राहकांच्या मनात ऑनलाइनबद्दल अविश्वास निर्माण झाल्याचे मुख्य कारण सांगण्यात आले.
औरंगाबाद परिमंडळामधून नोव्हेंबरमध्ये औरंगाबाद शहरातील १ लाख ९० हजार १९१ ग्राहकांनी ५० कोटी ४४ लाख रुपयांची बिले ऑनलाइन भरली. ग्रामीण भागातील १ लाख ७१ हजार ४६९ ग्राहकांनी ३० कोटी ५१ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन भरली, तर जालन्यातील ५२ हजार ७५२ ग्राहकांनी ४ लाख १४ हजार ४१२ रुपये याप्रमाणे एकूण १० कोटी ४३ लाखांची ऑनलाइन बिले भरण्यात आली. दोन लाख रुपयांच्या बिलांमागे ५०० रुपये सवलत मिळते. हीच सवलतीची कमाल मर्यादा आहे. त्याहीपेक्षा वीज भरणा केंद्रावर जाणे आणि बिलासाठी रांगेत उभे राहण्यासाठीचा वेळ वाचतो. इंधन व वेळ दोन्हींची बचत होते, ऑनलाइन पावतीही मिळते. मात्र, ग्राहकांच्या मनात अद्याप याबाबतचा विश्वास निर्माण झालेला नाही. वीज बिल भरा, अन्यथा कनेक्शन कट होईल, असा इशारा देणाऱ्या फसव्या वेबसाइट्सद्वारे फसवणुकीचे प्रकार झाल्याने वीज ग्राहकांचा भरवसा प्रत्यक्ष बिले भरण्यावर आहे. आजही ५३.७१ टक्के ग्राहक प्रत्यक्ष वीज बिल भरतात.
ऑनलाइन वीज बिल भरण्यात कोकण प्रादेशिक विभाग अव्वल विभाग ग्राहक भरणा कोकण ४९२१६९३ १००१ कोटी १२ लाख पुणे ३३७५४७१ ७५१ कोटी ८५ लाख नागपूर १९३३२५६ २९९ कोटी १५ लाख औरंगाबाद ९२३२८३ १७७ कोटी ९६ लाख
ऑनलाइनवर सवलत : ०.२५% २०० रुपयांना ५० पैसे तर १ हजारांना अडीच रुपये, दहा हजारांना २५ रुपये सवलत मिळते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.