आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:मराठवाड्यातील 421 पैकी 31 मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; परभणीतील पालममध्ये सर्वात कमी 27.8 मिमी पावसाची नोंद

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • 130 मंडळांत दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस

मराठवाड्यात चार ऑगस्टपर्यंत परभणी जिल्ह्यातील पालम मंडळात सर्वात कमी म्हणजे केवळ २७.७ टक्के आणि नांदेडमधील नालेश्वर ४५.९ व वाजेगाव ४६.९ टक्केच पाऊस पडला, तर एकूण ४२१ पैकी ३१ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झालेले आहे. येथे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हजारो शेतकरी हवालदिल आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मान्सूनचा निम्मा हंगाम संपला आहे. कुठे मुसळधार, ढगफुटीसारखा पाऊस तर कुठे पावसाचा थेंबही पडला नाही. यात कोकण, सांगली, कोल्हापूरसह मराठवाड्यातही १९४ मंडळांचा अतिवृष्टीत समावेश होतो. या भागात अतिवृष्टीने दाणादाण उडवली. परभणी जिल्ह्यातील पालम मंडळात ४ ऑगस्टपर्यंत ३६४.९ मिमी अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ १०१.६ मिमी म्हणजे २७.८ टक्केच सर्वात कमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली.

मराठवाड्यात पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात अल्प पावसाची स्थिती असल्याचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे म्हणाले.

१३० मंडळांत दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस
मराठवाड्यातील १३० मंडळांमध्ये १५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यात हिंगाेली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड येथील मंडळांचा समावेश आहे.

पावसामध्ये स्थलनिहाय फरक का?
ग्लोबल वॉर्मिंग, स्थानिक हवामानातील बदल झाल्याने पावसाच्या वितरणात स्थलनिहाय फरक आहे.

काही मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस का?
ज्या मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तेथे सापेक्ष आर्द्रता व कमी हवेच्या दाबाचा अभाव होता. तुलनेत जवळच्या मंडळात कमी दाब व सापेक्ष आर्द्रता निर्माण झाल्याने शेजारील मंडळात अतिवृष्टीची झाली.

अतिवृष्टीच्या ठिकाणी पिकांची स्थिती काय?
१३० मंडळांत काही वेळेत धो-धो पाऊस पडल्याने माती, पिके वाहून गेली. पाणी साचून राहिले. शेतकऱ्यांना दुबारा पेरणी करावी लागली. - रामचंद्र साबळे, हवामान शास्त्रज्ञ

बातम्या आणखी आहेत...