आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:खंडपीठ लॉयर्स चेंबरचे 25 मार्च रोजी उद्घाटन, न्यायमूर्तींनी केली पाहणी

छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ परिसरात लॉयर्स चेंबर्सचे काम अंतिम टप्प्यात आहे. २५ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत लोकार्पण केले जाणार आहे. खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी साेमवारी कामकाजाची पाहणी केली. पहिल्या टप्प्यात २७० वकिलांना चेंबर मिळाले. एकूण ५१० लॉयर्स चेंबरची निर्मिती केली जाणार असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष ॲड नितीन चौधरी व सचिव सुहास उरगुंडे यांनी स्पष्ट केले. या वेळी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. व्ही.डी. साळुंखे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...