आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चिनी नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. विभा कंकणवाडी यांनी गुरुवारी औरंगाबाद पोलिसांना दिले.
मांजा पुरवणारे, खरेदी करणारे, विक्री करणारे व पतंगाला लावून उडवणाऱ्या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. किती जणांवर कारवाई केली यासंबंधीचा अहवाल १ जानेवारी २०२१ रोजी खंडपीठात सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे २ दिवसांपूर्वी दुचाकीवर मागे बसून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. नागपूर येथे नायलॉन मांजामुळे एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. माध्यमांमधील वृत्तांची दखल घेत खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे व मृत होण्याचे प्रमाण बरेच आहे. औरंगाबाद पोलिस आयुक्तालय व जिल्ह्यात अशा प्रकारे मांजा वापरणाऱ्यांवर काय कारवाई केली? किती साठवणूकदारांवर छापे मारले, किती गुन्हे दाखल केले, मांजा वापराच्या बंदीसंबंधी राष्ट्रीय हरित लवादाने ११ जुलै २०१७ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जात आहे काय, अशी विचारणा खंडपीठाने केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.