आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेचा लाभ:महसूलच्या 175 कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगत योजनेचा लाभ ; दहा वर्षे झाल्यानंतर मंडळ अधिकारीपदी बढती मिळते

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील महसूलच्या १७५ कर्मचाऱ्यांना शासनाच्या आश्वासित पदोन्नतीसाठीचा लाभ मिळाला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या ऑर्डर काढल्या. जे अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र होते, मात्र जागा नसल्यामुळे पदोन्नती मिळत नव्हती त्यांना या आश्वासित प्रगती योजनेमुळे लाभ होणार आहे. यामध्ये कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी, टंकलेखक यासह विविध अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी म्हणाले, शासकीय सेवेत १०, २० आणि ३० वर्षे सेवा झाल्यानंतर पदोन्नती देण्यात येते. मात्र दहा वर्षे काम केल्यानंतर पदोन्नतीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. आता दहा वर्षे झाल्यानंतर त्याला पदोन्नती देऊन त्या पदाचे वेतन देण्यात येत आहे. तलाठ्याला दहा वर्षे झाल्यानंतर मंडळ अधिकारीपदी बढती मिळते. मात्र मंडळ अधिकाऱ्यांची जागा रिक्त नसल्यामुळे त्यांची अडचण होते. आता अशा कर्मचाऱ्यास मंडळ अधिकाऱ्यांचा दर्जा आणि वेतन प्राप्त होईल. ज्या वेळी जागा रिक्त होईल तेव्हा त्या जागेवर त्यांची नियुक्ती होईल.

बातम्या आणखी आहेत...