आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रयोदशी महोत्सव:वक्तव्यांचा विपर्यास करणाऱ्या ढोंगी गुरूंपासून सावध राहा : हरिविलासजी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत-महंतांच्या वक्तव्यांचा विपर्यास करून स्वत:चे महत्त्व वाढवणाऱ्या ढोंगी साधूंपासून भाविकांनी सावध राहावे, असा सल्ला हरिविलास महाराज यांनी भाविकांना दिला. इस्कॉन व्हीईसीसीच्या वरूड फाटा येथील मंदिरात आयोजित नित्यानंद (बलराम अवतार) त्रयोदशी महोत्सवानिमित्त ते बोलत होते. या महोत्सवात १ तासाच्या यज्ञात सहभागी होऊन ६ भाविकांनी दीक्षा घेतली. महाराज म्हणाले, ‘भगवान कृष्णाची सेवा करण्याची भक्ताची प्रामाणिक इच्छा असेल तर त्या भक्ताला कृष्ण मार्ग दाखवतात. आध्यात्मिक मार्गात उन्नत होण्यासाठी प्रामाणिक गुरूची नितांत आवश्यकता असते.’

आज निघेल देखणी रथयात्रा मंदिर समितीच्या वतीने रविवारी रथयात्रा काढली जाईल. दशमेशनगरमधील महादेव मंदिरातून दुपारी १ वाजता यात्रेला सुरुवात होईल. सहकार चौक, खिंवसरा वुड्स, ऑगस्ट होम्स, हॉटेल रुद्र, रिलायन्स मॉल, हिंदू राष्ट्र चौक, पुंडलिकनगर रोड, कामगार चौकमार्गे शिवछत्रपती महाविद्यालयात यात्रेची सांगता होईल. संध्याकाळी ६.३० वाजता कथा, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम होईल. हरिविलास महाराजांच्या निरूपणानंतर महाप्रसादाने सांगता होईल.

बातम्या आणखी आहेत...