आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यू हनुमान नगर गारखेडा परिसरात बुधवारी सकाळी 11 वाजता बालगोपालांनी एकत्रित सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर थोर महापुरुषांबद्दल चुकीचे विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. कोश्यारी यांचे फोटो असलेले पोस्टर्स हातात उलटे घेऊन ते फाडून पायाने तुडवले. राज्यपाल चले जाव, च्या घोषणाही दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी देखील उपस्थित होते. त्यांनी दंडाला काळ्या फिती बांधले होते.
शिवप्रेमींची आक्रमक भूमिका
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करणे, सातत्याने चुकीचे विधान करून समाज भावना भडकवणारे राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा, विविध संघटना, शिवप्रेमींच्या वतीने होत आहे. मात्र, केंद्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्यावतीने रविवारपासून निषेध सप्ताह राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल वाधन व बोंबा मारो आंदोलन करण्यात आले. सोमवारी क्रांती चौकात दोन भले मोठे बॅनर लावून त्यावर आणि व्यक्तिगत पत्र लिहून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
ही सर्व पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना पाठवण्यात आले आहेत. 6 डिसेंबर रोजी (मंगळवारी) संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संविधानिक पदावर बसलेल्या राज्यपाल सतत असंविधानिक वक्तव्य करत असून त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. तर 7 डिसेंबर रोजी बालगोपालांनी या निषेध सप्ताहात सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचे विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
राज्यपालांचे उलटे फोटो व त्यावर फुली मारलेली होती. महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल चुकीचे वेधान करणाऱ्यांनी संविधानात्मक पदावर राहू नये, त्यांनी चालत व्हावे, अशी मागणी देखील या बालगोपालांनीच केली आहे. एक तास हे आंदोलन चालले. राष्ट्रगतीने निषेध आंदोलनाची सांगता झाली.
मराठा क्रांती मोर्चाचे नेते उपस्थित
अभिजित देशमुख, विनोद पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, सुरेश वाकडे पाटील, अशोक मोरे, रमेश गायकवाड, सचिन मिसाळ, शिवाजी जगताप, पांढरीनाथ गोडसे पाटील, भरत कदम पाटील, तुकाराम बारबैले, निलेश ढवळे पाटील, मनिषा मराठे, सुकन्य भोसले, रेखा वाहटुळे, दिपाली जाधव आदी उपस्थित होते.
सायंकाळी एमआयएचा मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून राज्यात अशांतता पसरवणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना तात्काळ हटवण्यात यावे, यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात सायंकाळी 4 ते 5 या वेळेत क्रांती चौकात निदर्शने आंदोलन केले जाणार आहे.
उद्या थाळी वाजवा
मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमींच्या वतीने उद्या मुकुंदवाडी येथे सकाळी 10 वाजता थाळी वाजवा आंदोलन केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.