आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांना हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम:औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; राष्ट्रपतींना पत्र पाठवणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने चुकीचे विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना माघारी बोलवावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात शिवप्रेमींनी सोमवारी क्रांती चौकात स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यामध्ये एक हजाराहून अधिक जणांनी सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला. तसेच सर्व पत्र राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करणे, सातत्याने चुकीचे विधान करून समाज भावना भडकवणारे राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा, विविध संघटना, शिवप्रेमींच्या वतीने होत आहे. मात्र, केंद्र सरकारने त्याची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या वतीने निषेध सप्ताह राबवण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी पहिल्या दिवशी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल वाधन व बोंबा मारो आंदोलन करण्यात आले. तर सोमवारी क्रांती चौकात दोन भले मोठे बॅनर लावून त्यावर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. तसेच व्यक्तिगत पत्र लिहून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

यामध्ये शहरातील मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी सहभाग घेतला. ही सर्व पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना पाठवून राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची, परत बोलवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींनाच राज्यपालांना परत बोलवण्याचे अधिकार असतात. त्यामुळे हि मोहीम राबवल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले. यानंतरही राज्यपालांना हटवले नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारही त्यांनी दिला.

केंद्रिय राज्यमंत्री दानवेंच्या घरासमोर ढोलवादन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबरच राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे ही सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करत आहेत. त्यांच्या निषेधार्थ सुतीगिरणी चौक परिसरातील त्यांच्या घरासमोर ढोल वादन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आले आहे.

जे पाठिशी घालतील त्यांनाही ठोकून काढणार

मराठा क्रांती मोर्चा आक्रम झाला आहे. जे जे थोर महापुरुषांच्या बद्दल चुकीचे विधान करतील त्यांना गनीमी काव्याने ठोकून काढले जाईल. असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

उद्या संविधान वाचन

निषेध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी 6 डिसेंबरला संविधान वाचन होणार आहे. क्रांती चौकात, संविधान वाचून संविधानिक पदावर असलेल्या राज्यपालांना हटवण्याची मागणी केली जाणार आहे. अशी माहिती प्रा. चंद्रकांत भराट, विनोद पाटील, अभिजित देशमुख, सुनील कोटकर, डॉ. शिवानंद भानुसे, सुरेश वाकडे, रेखा वाहटुळे आदींनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...