आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोश्यारींविरोधात शिवप्रेमी आक्रमक:राज्यपालांना हटवण्यासाठी शिट्टी वाजवा आंदोलन; 'कचरा हटाव'ची केली घोषणा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतत चुकीचे विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकार पाठीशी घालत आहे. याविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्त्वात निषेध सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी आंदोलनाच्या सहाव्या दिवशी सिडको एन - 7 मध्ये शिट्टी वाजवून कचऱ्याची गाडी आली कचरा हटावा, असे उपरोधिक अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकराने झोपेचं सोंग घेतले

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासह देशाची शान आहे. त्यांच्या विषयी राज्यपाल कोश्यारी सतत चुकीचे विधान केले. यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. राज्यपाल हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकाराने झोपेचं सोंग घेतले आहे. त्यामुळे सरकार विरोधात रविवारी पासून विविध माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात येतं आहे.

त्यानुसार सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल वादन आंदोलन, स्वाक्षरी मोहीम, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर ढोल वादन, बालगोपालांनी राज्यपालांचे फोटो असलेले पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला. तर मुकुंदवाडी येथे थाळी वाजवून तर एन-7 सिडको येथे शेट्टी बजाव आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी आंदोलन करणार

तोरणा पुरुषांचा अपमान करणारे भगतसिंग कोचर यांना हटववण्यात येवे या मागणीसह सत्ताधारी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यांनी आंदोलनात सहभाग घेतला

रवींद्र तांगडे पाटील अभिजीत देशमुख रेखा वाठोळे सुकन्या भोसले पंढरीनाथ पाटील सुनील कोटकर निलेश ढवळे सचिन मिसाळ अशोक मोरे आप्पासाहेब कुडेकर पाटील आधी मोठ्या संख्येने शिवप्रेमी आंदोलना सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...