आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरीक औषधामुळे रुग्णांचे 20 हजार कोटी रुपये वाचले:जनऔषधी दिनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती; देशात सुमारे 9000 दुकाने

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात जनरीक औषधीचे देशात जवळपास 9000 दुकाने आहेत. त्या माध्यमातून मिळणारी औषधे ही ब्रँडेड औषधी पेक्षा 50 ते 90 % पर्यत स्वस्त आहेत. ही औषधी उच्च दर्जाचे असल्याचे सांगत या औैषधामुळे देशात रुग्णांचे वीस हजार कोटी रुपये वाचल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले. रविवारी 5 वा जनऔषधी दिवस साजरा करण्यात आला. यानिमीत्ताने आयोजित आयएमए हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक दयानंद मोतीपवळे , घाटीचे डॉ. कैलास झिने अन्न औषध प्रशासन सह आयुक्त गिरीश हुकरे सहाय्यक आयुक्त संजय काळे आयएमएचे अध्यक्ष डॉ. सचिन फडणीस, डॉ. उज्वला दहिफळे उपस्थित होते.

12 मार्च रोजी 2023 रोजी IMA हॉल, छत्रपती संभाजी नगर येथे 5 वा जन औषधी दिवस साजरा करण्यात आला. या वेळी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉक्टरांनी रुग्णांना द्यावीत औषधे

यावेळी कराड म्हणाले की सामान्य रुग्णाना परवडणारी औषधे ही जनरीकची आहेत.त्यामुळे डॉक्टरांनी देखील रुग्णांना परवडणारी औषधे द्वयावीत अश्या सुचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या आहेत.

यावेळी महिलांना औषधी साहित्य किट वाटप करण्यात आले. यावेळी हुकरे यांनी सागितले देशात तिसऱ्या क्रमांकावर औषधी उत्पादनात भारताचा क्रमांक आहे. जेनेरिकमुळे लोकांना फायदा होत आल्याचे त्यांनी यावेळी सागितले.

बातम्या आणखी आहेत...