आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविचार नसलेली वज्रमूठ केवळ भाजपच्या विरोधात असून ती मूठ कधीही एकत्र राहू शकणार नाही, असे म्हणत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय. छत्रपती संभाजीनगर शहरात आज महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या खैरी पहायला मिळत असताना भाजपकडूनही मविआच्या सभेवर टीका होत आहे.
काय म्हणाले कराड?
कराड म्हणाले, सभेत होणाऱ्या टीकेला आम्ही डगमगणारे नाहीत. आम्ही त्याला लवकरच उत्तर देऊ. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सावरकरांचे कौतूक करतात आणि काँग्रेसचे नेते सावरकर यांच्यावर टीका करतात. हा विरोधाभास आहे. त्यामुळे ही वज्रमूठ नसून केवळ भाजपला विरोध करण्याची वज्रमूठ असल्याचे कराड यांनी सांगितले. गौरवयात्रा ताकद दाखवण्यासाठी नाही आमची गौरव यात्रा ताकद दाखवण्याची नाही. सावरकरांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आमची ही सावरकर गौरव यात्रा आहे. सभा आणि सावरकर गौरव यात्रा एका ठिकाणी येणे योगायोग आहे. ही महाविकास आघाडीची सभा संपूर्ण मराठवाड्याची असून, केवळ छत्रपती संभाजीनगरची नाही. पण आमची गौरव यात्रा फक्त एका मंडळाची आहे.
हे मान्य आहे का?
भारत मातेचं पूजन महाविकास आघाडीसाठी अनपेक्षित असले तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच शिवसेना गट भारत मातेचं पूजन करत आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे मान्य आहे का?असा सवालही भागवत कराड यांनी उपस्थित केला.
मविआच्या नेत्यांवर टीका
महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांवरदेखील कराड यांनी टीका केलीय. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आऊट झालेले नेते आहेत . शिवसेना फुटल्यामुळे त्यांना तात्पुरते महत्व प्राप्त झाले आहे. अंबादास दानवे त्यांच्या खालचा नेता शेकडो किलोमीटर पुढे गेलाय. त्यामुळे खैरे यांची तथ्यहीन आणि वायफळ बडबड सुरू असते. तसेच मी कधीही खैरे यांच्यासोबत डिबेट करायला तयार आहे. मी केलेली दहा कामं त्यांना वीस वर्षात करणे जमले नाही, असे कराड म्हणाले. तर नाना पटोले, अशोक चव्हाण यांची भूमिका सावरकरांच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.