आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प सर्वच घटकांना न्याय देणारा आहे. विशेषतः मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आली, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थसंकल्पात प्रामुख्याने वॉटर ग्रीड, नाथ जलाशयातील फ्लोटिंग सोलार, छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळासाठी विस्तारीकरणासाठी भरघोस 734 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली.
डॉ. भागवत कराड म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठविला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून वाटर ग्रीड द्वारे पाणी मिळणार आहे. बीड, लातूर जिल्ह्यासाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्व मनार, धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना ,कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून पाणी वाटर ग्रीड ला उपलब्ध होणार आहे.
मागणी केली होती
डॉ. भागवत कराड म्हणाले, छत्रपती संभाजी नगरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यासंदर्भात, मी सातत्याने आग्रही मागणी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 148 एकर जमिन भूसंपादन करून किमान 800 कोटी रु, विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली होती.
सौर ऊर्जेमध्ये क्रांतिकारी पाऊल
डॉ. भागवत कराड म्हणाले, अर्थसंकल्पामध्ये संभाजीनगरच्या विमानतळाच्या भूसंपादनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून 734 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विस्तारीकरण आणि धावपट्टीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जायकवाडी नाथ सागर जलाशयात तरंगत्या सौर ऊर्जा पॅनल द्वारे वीज निर्मितीला प्राधान्य गेल्या अनेक वर्षापासून जलाशयावरती तरंगते सौर ऊर्जा टाकण्यासंदर्भात मी सातत्याने केंद्र सरकार नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन आणि गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता. त्यामुळे आजची घोषणा निश्चितचपणे सौर ऊर्जेमध्ये क्रांतिकारी पाऊल राहणार आहे.
सिंचन आणि पाण्याच्या बाबतीमध्ये
गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नगर,जळगाव जिल्ह्यास याचा लाभ होईल.वैनगंगा खोऱ्यातून वाहून जाणारे पाणी वैनगंगा ,नळगंगा ,पैनगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये नागपूर वर्धा अमरावती वाशिम जिल्ह्यांना मिळणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक चे 350 वर्ष असल्या कारणाने संभाजीनगर, नाशिक, अमरावती, मुंबई, नागपूर येथे शिवचरित्र उद्यानासाठी 250 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या नागपूर तलावाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील नवीन क्रीडा विद्यापीठासाठी 50 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली असून, अनेक दिवसापासून क्रीडा विद्यापीठाची निधीची मागणी पूर्ण होत आहे.
शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील असल्याने ,शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये 3339 कोटी रू. भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 12 हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार असल्याने केंद्र सरकारचे 6000 आणि राज्याचे 6000 असे प्रति वर्षी 12 हजार रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार असून, 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
हवामान बदलाच्या कचाट्यात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी बाब म्हणजे केवळ एक रुपयात पिक विमा आता यापुढे काढता येणार आहे. यापूर्वी योजनेमध्ये विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून भरावी लागत होते आता शेतकऱ्यावरती कोणताच भार नसणार असून, सरकार सर्व हप्ते भरणार आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा काढता येणे शक्य होणार आहे.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
डॉ. भागवत कराड म्हणाले, शेतकऱ्यांसाठी निवारा भोजन योजना शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुविधा आणि शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असून जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धही करून देण्यात आली आहेत.
डॉ. भागवत कराड म्हणाले, मासेमारी करणाऱ्यांची कुटुंबांसाठी 50 कोटीचा मत्स्य विकास कोश यामध्ये विमा आणि डिझेल अनुदानाचा हिस्सा सरकारकडून देण्यात येणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जो की धाराशिव बीड जिल्ह्यातील 133 गावांना या सिंचनासाठी लाभ होणार असून 11 हजार 626 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.