आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त 'फिटनेस फेस्ट':तळागाळापर्यंत डायलिसीस सेवा पोहचवण्यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करणार, डॉ भागवत कराडांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक जिल्हा रुग्णालयापर्यंत डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करेन असे आश्वासन केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. जागतिक मूत्रपींड दिनानिमित्त आयोजित 'फिटनेस फेस्ट' कार्यक्रमात ते बोलत होते.

सुमन किडनी फाऊंडेशन, उत्कर्ष हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट , जेआयआययू चे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च आणि निझॉन ट्रेनिंग सिस्टीम यांच्यावतीने जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने प्रत्यारोपित रुग्ण आणि दाते यांच्यासाठी फिटनेस फेस्टचे आयोजन करण्यात आले होते.

बदनापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मौलाना हुजेफा वस्तान्वी, डीन अझहर अहमद सिध्दीकी प्रमुख पाहुणे तर एमआयटीचे अध्यक्ष मुनिष शर्मा अध्यक्षस्थानी होते. सुमन किडनी फाऊंडेशनचे डॉ. सुहास बावीकर यांनी डॉ . कराड यांचे स्वागत केले. एमआयटी हॉस्पिटलचे संचालक मुनीश शर्मा यांचे स्वागत डॉ .पूर्वा बावीकर यांनी केले . वैद्यकीय व्यवस्थापक डॉ. संतोष ढाकणे यांची यावेळी उपस्थिती होती.

सरकार निधी वाढत आहे

वैद्यकीय सेवेचा विस्तार करण्यासाठी अभ्यासक्रमात जागा वाढवण्याबरोबरच आर्थिक तरतूदही केंद्र सरकार वाढवत आहे . त्यामुळे किडनी आणि इतर आजाराच्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सोयी उपलब्ध होतील असा विश्वास डॉ . कराड यांनी यावेळी व्यक्त केला .

एमआयटीचे संचालक मुनीश शर्मा यांनी महात्मा फुले योजना किडनीच्या रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, प्रत्यारोपित रुग्णदय आणि दात्यांसाठी दरवर्षी साजरा होणारा मूत्रपिंड दिन हा वार्षिक सणासारखाच असतो. मराठवाडा तसेच महाराष्ट्रातून आलेले रुग्ण आणि दाते या वार्षिकोत्सवात सहभागी होऊन किडनी आरोग्याचा संदेश देत असतात.अनुभवाची देवाण घेवाणीतून एकमेकांना दिलासा तर देतात.किडनी विकाराबरोबर जगताना आरोग्य कसे राखायचे यासंदर्भात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावेळी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांप्रमाणे जिवन जगण-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांचे अनुभव प्रेरणादायी ठरले.

डायलिसिसवरील रुग्ण सहभागी

पहिल्यांदाच डायलिसीसवर असलेले रुग्ण सायकल स्पर्धेत सहभागी झाले होते. 3, 5 आणि 10 किलोमिटर स्पर्धेत उत्साहाने किडनी रुग्णांनी सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजीनगर सायकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. शंभर मिटर स्पर्धेतही अनेकांनी सहभाग नोंदवला. डॉ. गायत्री कुलकर्णी यांनी रुग्णांना शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी योगाचे महत्व समजावून सांगितले. मूत्रपिंडरोग तज्ज्ञ डॉ. पुर्वा बाविकर मूत्रपिंड आणि आरोग्य यावर मार्गदर्शन केले .

बातम्या आणखी आहेत...