आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज निघणार प्रभातफेरी:व्हीआयपी कल्चरला छेद देत 3000 भाविकांच्या उपस्थितीत भागवत कथा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडकेश्वर मंदिराच्या प्रांगणात २४ ते ३० नाेव्हेंबरदरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जोधपूर येथील राधाकृष्ण महाराज कथा सांगतील. कथेच्या आयोजनासाठी माहेश्वरी प्रगती मंडळ नियोजन करत आहे. त्यामुळे प्रचार-प्रसारासाठी मंडळातर्फे दररोज प्रभातफेरी काढण्यात येईल. सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला प्रगती मंडळ अध्यक्ष उषा धूत, प्रमिला चांडक, स्वाती खटोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

चांडक म्हणाल्या, माझे सासरे स्व. मदनलाल चांडक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही हे आयोजन केले आहे. दररोज ३ हजार भाविक पेंडाॅलमध्ये हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. धूत म्हणाल्या, भागवत कथेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी व्हीआपींसाठी कोणतीही व्यवस्था नाही. राधाकृष्ण महाराज अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम करण्यावर भर देतात. समाजात समानता असली पाहीजे, असा त्यांचा विचार आहे. ही कथा सर्व जाती-धर्माच्या भाविकांसाठी खुली आहे, असेही आाहन दोघींनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...