आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:भय्यासाहेबांनी आंबेडकरी चळवळीला दिशा दिली

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भय्यासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कुठलाही बडेजाव न करता स्वाभिमानी जीवन व्यतीत केले, असे प्रतिपादन श्रावण गायकवाड यांनी केले. ते भय्यासाहेबांच्या जयंतीनिमित्त भडकल गेट येथे मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

सचिन निकम यांनी चैत्यभूमीचे निर्माण, बौद्धांच्या हक्क अधिकारासाठी केलेली आंदोलने, विधान परिषद सदस्य म्हणून बौद्धांना मिळवून दिलेल्या सवलती यातून बाबासाहेबांनंतर केवळ भय्यासाहेब आंबेडकर यांनीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिशा देत स्वाभिमानी बाणा जपला. बाबासाहेबांची प्रकाशित ग्रंथसंपदा, बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल संघटनांसाठी भय्यासाहेबांनी परिश्रम घेतले, असे गौरवोद्गार काढले.

बातम्या आणखी आहेत...