आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव कारची दुचाकीला धडक; मायलेकाचा मृत्यू, हिंगोली ते नरसी मार्गावरील भीषण अपघात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते नरसी नामदेव मार्गावर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (८ मे) रात्री घडली आहे. सावित्रीबाई जेजेराम झाडे (४५) व ज्ञानेश्वर जेजेराम झाडे (२४) अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मातृदिनी झालेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील खुडज येथील सावित्रीबाई व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर हे दोघे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकीवर (एमएच १४ जीक्यू ९४२९) हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते. त्यांची दुचाकी ब्रह्मपुरी पाटीजवळ आली असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात सावित्रीबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.

बातम्या आणखी आहेत...