आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतांची मैफल:‘भूले बिसरे गीत’ हिंदी गीतांची मैफल ; लता मंगेशकरांना सर्व कलाकार व रसिकांनी श्रद्धांजली वाहिली

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आविष्कार बहुउद्देशीय शिक्षण मंडळ संचालित हे सुरांनो चंद्र व्हा ग्रुप निर्मित “भूले बिसरे गीत’ हिंदी गीतांची संगीत मैफल पार पडली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व लता मंगेशकरांना सर्व कलाकार व रसिकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी मथुरादास देशमुख यांनी ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’ या गजाननाच्या गीताने सुरुवात केली. त्यानंतर एकापेक्षा एक सरस गीतांनी मैफलीस सुरुवात झाली. मथुरादास देशमुख, राजेंद्र औसेकर, रिझवान अहमद, मुकर्रम अली खान, अॅड. अमित राजवैद्य, अॅड. सुभाष तिळवे, सुनील भावठाणकर, आनंद देसाई, कल्पना देसाई, विद्यासागर व्ही. डी., विलास पदे, सलीम भिलवडे, शोभा हराळ यांनी गीते सदर करून रसिकांची दाद मिळवली. अनुया जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...