आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन:भुजंगासन, वक्रासनाचे गिरवले अनेकांनी धडे ; आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांत मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी याेग प्रशिक्षकांनी आरोग्यासाठी योग किती महत्त्वाचा याबद्दल मार्गदर्शन केले. लहान मुलांनीही वेगवेगळ्या प्रकारची आसने केली.

मराठा हायस्कूल

चौराहा येथील मराठा हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. रूपेश मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक सुहास मडके, पर्यवेक्षक विजय गायके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. योग शिक्षिका राजश्री तौर आणि संगीता उगले यांनी व्यायाम व योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्काऊट गाइड कार्यालयाच्या मैदानावर रामदास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी मंगल पवार, रवींद्र माळी, राजश्री तौर, शिवाजी पठाडे, सुनील लंगडे, राजेंद्र नेरकर, संगीता उगले, अरुण देशमुख, संगीता भोसले, दिगंबर पंडित, सुवर्णा जोशी, कल्याण कुदळे, प्रमिला कळम, आशा वाघ, नाजेरा पठाण, सुधीर पाटील, अरुण माने, विष्णू लिंबाळकर, सुनीता डायगव्हाणे, सुरेखा लिपाने, प्रतिभा ठाकरे, शिवप्रसाद उबाळे, अरुण ठाकरे, विजया सपकाळ, नरेंद्र महालपुरे, धवळू बहिरम, पीरखां पठाण, राजू निकम, बाप्पासाहेब गोर्डे, पांडुरंग शिरसाठ, हनुमंत पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स

योग शिक्षक अंबादास महादेव वाघ यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. डी. राठोड यांनी योगाचे महत्त्व या विषयावर प्रकाश टाकला. डॉ. बालाजी शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. योग शिक्षक वाघ यांनी सूर्यनमस्कार, भुजंगासन, वक्रासन, तिकोनासन, अर्धभुजंगासन, कपालभाती आणि भ्रमर प्राणायामाचे फायदे प्रात्यक्षिक आणि वर्णन केले. प्रा. प्रदीप कापकर यांनी आभार मानले. एनएसएसचे डॉ.आर.ए.वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ.एम.पी.कुल्थे, डॉ.डी.व्ही.कुरमुडे, डॉ.के.एन.विधाते, कॅप्टन एम.एल.वाव्हळ, पी.व्ही.इटाल, लता इंगोळे, आनंद थोरात, महेंद्र पंडुरे, सूरज सलामपुरे, रमजान तडवी, मनोज येरपुल्ले आदी उपस्थित होते.

पोदार जम्बो किड्स

विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर केली. योगाचे महत्त्व सांगणारा पपेट शो सादर केला. गोष्टीच्या सादरीकरणातून योगाचे महत्त्व सांगीतले. कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

अनंत भालेराव शाळा चेतनानगर येथील अनंत भालेराव शाळेत माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रुती कुलकर्णी- इनामदार उपस्थित होत्या. पतंजली योग केंद्राचे शिक्षिका संगीता तोंडे, शुभांगी जोशी यांनी योग प्रात्यक्षिक दाखवले. माजी विद्यार्थिनी निकिता जोशी उपस्थित होत्या. प्रास्ताविक संगीता साठे यांनी केले. शिक्षिका सोनल नलावडे, उषा अनमोड, ज्योती वीर, मंदा निकाळे, दिनेश गवारे, सविता मणूरकर, उज्ज्वला पिंपरकर, वैशाली वायकोस उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधा कुलकर्णी यांनी केले, तर आभार रोहिणी जोशी यांनी मानले.

विभागीय क्रीडा संकुल

: विभागीय क्रीडा संकुल समिती, क्रीडा उपसंचालक, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती. तसेच ४०० खेळाडू, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. योग संघटना व जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी भारतीय योग संस्थान महाराष्ट्र प्रांतचे डॉ. उत्तम काळवणे, विद्या ताकसांडे, कविता खोसे यांनी उपस्थितांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. क्रीडाधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी सूत्रसंचालन केले तर लता लोंढे यांनी आभार मानले.

शिशू विकास मंदिर माध्यमिक शाळा मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी योग अतिशय आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज योगा करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन मुख्याध्यापिका कामिनी कुलकर्णी यांनी केले. श्रेयनगर येथील शिशू विकास मंदिर माध्यमिक शाळेत रोटरी परिवारासह आंतरररष्ट्रीय योग दिन साजरा केला. योग शिक्षक पंडित वहाटुले, मिलिंद देशपांडे व दीपाली कुलकर्णी यांनी ओमकार, ध्यान, प्राणायाम, उभे व बैठे आसने, पोटावर व पाठीवर झोपून करावयाचे आसने करून घेण्यात आली. याप्रसंगी पर्यवेक्षिका अनिता कुलकर्णी, आशिष सोनटक्के, संदीप बन्सल, जयेश पवार, क्रीडा शिक्षक डी. आर. खैरनार, सुभाष जाधव आदींची उपस्थिती होती.

संस्कार प्राथमिक विद्यालय : योगशिक्षिका ज्योती खिर्डीकर यांनी संस्थेचे अध्यक्ष जगदीश देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेतला. या वेळी मुख्याध्यापक सतीश तायडे, सुषमा जोशी, जावेद पठाण, मनीष विसपुते, सुनंदा बागुल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली पठाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी धनश्री पानगावकर, शैलजा सरोदे, रामहरी डमाळे, ओम पुरी, स्वप्निल गायकवाड, सुदर्शन देवरे, पोपट थोरात, अमित कांबळे, विश्वजित मासरे, विजय आडे, संतोष चव्हाण, जीवन गिरी, ज्ञानेश पवार, ललिता जोशी, जयश्री शिंदे, कविता जाधव, अर्पणा जोशी, कविता बोरोले, प्रतिभा पेातदार, वैशाली भिरुड, मनीषा गायकवाड आदी उपस्थित होते.

निवासी अस्थिव्यंग शाळा सावंगी येथील शाळेत फिजिओथेरपी शिबिर झाले. डॉ. सबा यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. फैज सय्यद, डॉ.शेख अफसर, साजिद पटेल, मकसूद अन्सारी, हाफिज अली, डॉ.अकरम पटेल, डॉ. नेहा पठाण उपस्थित होते. सूत्रसंचालन शेख मुख्तार यांनी केले. रमजानी खान यांनी विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन दिले. या वेळी मुख्याध्यापक आवेज पटेल, डॉ.सबा शेख, डॉ.नाजिया पठाण, सना शेख, असलम शेख, शेख सुभान, समीर पठाण, जावेद पठाण, सकलेन पटेल, आरेफ पठाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...