आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्‍वासन:नुकसानग्रस्‍त सर्व शेतक-यांना मदत करणारच- भूमरे

छत्रपती संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पाऊस, गारपिटीने‎ नुकसान झालेल्या प्रत्येक‎ शेतकऱ्याला शिंदे-फडणवीस‎ सरकार मदत करणारच, असा दावा‎ पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी‎ केला. कन्नड तालुक्यातील जेऊर,‎ निपाणी, औराळा तसेच फुलंब्री‎ तालुक्यातील कान्हेगाव व बाबरा या‎ नुकसानग्रस्त गावांलगतच्या पिकांची‎ भुमरे यांनी पाहणी केली. त्यावेळी‎ त्यांनी हे आश्वासन दिले.‎ त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी‎ आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते.‎ भुमरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधून‎ झालेल्या नुकसानीची माहिती‎ घेतली.‎ तातडीने पंचनामे करून अहवाल‎ तत्काळ शासनास सादर करावा,‎ अशी सूचना त्यांनी केली. जेऊर‎ येथील शेतकरी अशोक पवार,‎ निपाणी येथील दत्तात्रय निकम यांच्या‎ शेतातील कांदा, संजय पवार यांच्या‎ बाजरी पिकाच्या नुकसानीची‎ पालकमंत्र्यांनी पाहणी केली.‎ युती शासनाच्या काळातच मराठवाड्यातील‎ जिल्ह्याच्या शहरात स्तंभ उभारले गेले.‎ आगामी विधानसभा उद्धवसेनेसोबत लढताना‎ काही हिंदुत्ववादी मते मिळावीत, असा‎ काँग्रेसच्या नेत्यांचा हेतू दिसतो. कारण आतापर्यंत‎ काँग्रेसने कधीच उत्साहाने मुक्तिसंग्राम दिन‎ साजरा केला नाही. अर्थात राजकारणासाठी का‎ होईना काँग्रेसचे मुक्तिसंग्रामात सक्रिय होणे‎ चांगले आहे. पण काँग्रेसने या निमित्ताने काही‎ ठोस मराठवाड्याला मिळवून द्यावे, अशी‎ नागरिकांची अपेक्षा असल्याचे स्वामी रामानंद‎ तीर्थ संशोधन संस्थेचे सचिव, राजकीय‎ घडामोडींचे अभ्यासक सारंग टाकळकर यांनी‎ सांगितले.‎