आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिडकीन आणि आडूळमध्ये ग्रामपंचायतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यांची सत्ता आली आहे. आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ठाकरे गटाचे बबन भावले, तर बिडकीन येथे अशोक धर्मे हे विजयी झाले आहेत.
विरोधीपक्षनेते तथा जिल्प्रहामुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात बिडकीन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ठाकरे गटाचे उमेदवार अशोक धर्मे 1200 मतांनी विजय झाला आहे. तर शिंदे गटाचे उमेदवार बबन ठाणगे यांचा पराभव झाला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वच जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण याच गावात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅली काढल्या होत्या. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी चुरीशीची लढत पाहायला मिळाली होती. मात्र अखेर या ग्रामपंचायतवर ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे.
बिडकीन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ठाकरे गटाचे उमेदवार अशोक धर्मे यांचा विजय झाला आहे. अशोक धर्मे 1200 मतांनी विजयी झाले असून, शिंदे गटाचे उमेदवार बबन ठाणगे यांचा पराभव झाला आहे. ठाकरे गटासाठी हा विजय महत्वाचा समजला जात आहे. तर भुमरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेल्यामुळे भुमरेंना हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.
पैठणच्या 22 ग्रामपंचायतरीसाठी निवडणूक
औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल हाती येत आहेत. पैठण तालुक्यातील एकूण 22 ग्रामपंचायतीसाठी 94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी 20519 स्त्री आणि 23589 पुरुष असे एकूण 44108 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे पैठण तालुक्यात एकूण 86.64 टक्के मतदान झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.