आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन बिगिनिंग:बिडकीन ‘ऑरिक सिटी’चेही काम मार्चअखेर होणार; आता प्रतीक्षा उद्योगांची

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साडेसात हजार एकरांचा परिसर सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज, एप्रिलपासून कंपन्यांना प्‍लॅाट विक्री

दिल्ली-मुंबई औद्योगिक वसाहतीअंतर्गत (डीएमअायसी) औरंगाबादजवळ पहिल्या टप्प्यातील १० हजार एकरवर भव्य दिव्य उद्योगनगरी उभी करण्याचे काम अाता अंतिम टप्प्यात आले अाहे. शेंद्रा एमअायडीसीतील २५०० एकर जागेवर यापूर्वीच पाणी, रस्ते, वीज व इतर सुविधांची सर्व कामे पूर्ण झाली अाहेत. अाता बिडकीन येथील ७५०० एकर जागेवर ऑरिक औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांचे कामही ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर तेथील प्लॉट उद्याेगांना विक्री करता येतील, अशी माहिती एआयएलटीचे (औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड) महाव्यवस्थापक संजय काटकर यांनी बुधवारी दिली. बिडकीन एमअायडीसीतील कामांची पाहणी केल्यानंतर ते बाेलत हाेते.

‘लॉकडाऊननंतर ऑरिकमध्ये ‘मिशन बिगिनिंग’ सुरू झाले. शेंद्रा आणि बिडकीन एमआयडीसीत सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. आता प्रतीक्षा आहे ती नवीन उद्योगांची. ३ जूनपासून डीएमआयसीतील कामे पुन्हा सुरू झाली होती. या कामांचा आढावा घेण्यासाठी काटकर यांनी प्रत्यक्ष बिडकीन येथे भेट देऊन काम पाहणाऱ्या सीएचटूएम जेकब, शापूरजी पालनजी, एल अँड टी या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली आणि सूचना दिल्या.

पाच वर्षांपूर्वी ऑरिक सिटीचे प्रत्यक्षात काम सुरू झाले. हा प्रकल्प २५ हजार एकरवर असून त्यापैकी १० हजार एकर जमीन शेंद्रा आणि बिडकीनमध्ये अधिग्रहित करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेसहा हजार कोटींचा खर्च पायाभूत सुविधांसाठी करण्यात आला. या प्रकल्पाचे काम एआयएलटी ही कंपनी राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून पाहत अाहे. शेंद्रा परिसरात आतापर्यंत छोट्या-मोठ्या ६० कंपन्या सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जमिनीचे अधिग्रहण सुरू झाले असून आतापर्यंत १७०० एकर जमीन अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती एआयएलटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे एमअायडीसीशी जाेडणारा रस्ता तयार

ऑरिक सिटी आणि पश्चिम महाराष्ट्राला कमी वेळेत जोडणारा रस्ता तयार करणे आव्हान होते. मात्र दहेगाव बंगला, बिडकीन यांना जोडणारा रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे सुपा, रांजणगाव, तळेगाव, चाकण येथील उद्योगांना जोडणे सहज झाले आहे.

ऑरिक सिटी

  • ६० कंपन्या आतापर्यंत आल्या
  • १४००० एकर जागेचे अधिग्रहण बाकी
  • ६५०० काेटीं पायाभूत सुविधासाठी खर्च
  • १०,००० एकरांवर जमिनीचे अधिग्रहण

डीएमअायसीत दाेन वर्षांपासून एकही माेठा प्रकल्प नाही

दहा हजार एकरवर पायाभूत सुविधा सज्ज झाल्या अाहेत. मात्र पर्किन्स आणि ह्युसंग कंपन्यांनंतर गेल्या दोन वर्षांपासून ऑरिक सिटीत एकही मोठी गुंतवणूक अालेली नाही. गुजरात, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक, मध्य प्रदेश राज्ये तिकडे उद्योग नेत अाहेत. मात्र सहा वर्षे राज्याच्या उद्याेगमंत्र्यांकडे अाैरंगाबादचे पालकमंत्रिपद असूनही या डीएमअायसीत माेठे उद्याेग अाले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...