आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरातच झाली दुरवस्था:बीड-सोलापूर महामार्गावर पडले मोठमोठे खड्डे; पॅचवर्कच्या नावाखाली केली निव्वळ मलमपट्टी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने तयार करण्यात आलेल्या बीड-सोलापूर हायवेमुळे वेळ वाचत असल्याने अनेक वाहनचालक त्याचा वापर करत आहेत. पण एका वर्षातच या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले आहेत. खड्ड्यांत पॅचवर्कही करण्यात आले. परंतु ते ज्या पद्धतीने करण्यात आले त्यामुळे भरधाव जाणारी वाहने आदळतात, चालकाचाही तोल जातो. विशेष म्हणजे रस्त्यापेक्षा उड्डाणपुलाच्या सुरुवातीला व उड्डाणपुलावरच जास्त खड्डे आहेत. कांचनवाडी ते दौलताबाद रेल्वे मालधक्क्यापर्यंत पन्नासपेक्षा जास्त खड्डे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत आढळले.

मोठा गाजावाजा करत बीड-सोलापूर हायवेची निर्मिती करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. परंतु या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे झाल्याच्या तक्रारी काही वाचकांनी केल्या होत्या. त्याची पडताळणी करण्यासाठी कांचनवाडी ते दौलताबाद मालधक्क्यापर्यंत ‘दिव्य मराठी’ने पाहणी केली तेव्हा रस्त्यावरील खड्डे, खड्ड्यांवर केलेले पॅचवर्क यामुळे वाहनचालकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. दौलताबाद मालधक्क्याशेजारी असलेल्या पुलाची संरक्षक भिंत पडली आहे. लोखंडी बॅरिकेड्सही पूर्णपणे मोडलेले आहेत. ए. एस. क्लब उड्डाणपुलापासून हायवेकडे जातानाच दोन्ही बाजूंना खड्डे पडलेले आहेत. तेथेही पॅचवर्क करण्यात आले. साजापूरच्या पुढे असलेल्या टोलनाक्यानंतर सुरू होणाऱ्या उड्डाणपुलाचे कठडे तुटलेले दिसले. पुलावर दोन्ही बाजूंनी खड्डे पडले होते.

सब-वेवरही खड्डे विशेष म्हणजे आसपासच्या गावांसाठी तयार करण्यात आलेल्या सब-वेचीही दुरवस्था पाहायला मिळाली. पुलाखालच्या व शेजारी असलेल्या सब वेवरही खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांत केवळ खडी टाकलेली आढळली.

बातम्या आणखी आहेत...