आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुचर्चित बहुप्रतिक्षित फ्लाय बिग विमानसेवा बुधवारपासून सुरू झाली. हैदराबाद - औरंगाबाद विमानसेवेचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. सकाळी 8.40 वाजता विमानाने हैदराबादकडे उड्डाण घेतले. यावेळी वॉटर सॅल्यूट देण्यात आले. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या कमिटीचे प्रमुख सुनील कोठारी, फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत आणि विमानतळ प्राधिकरण संचालक डी. जे. साळवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
2018 मधे औरंगाबादेतून दिल्ली, मुंबई, मुंबई अशी तीन विमान उड्डाण घेत होती. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नानंतर औरंगाबाद येथून जवळपास चौदा विमानांची उड्डाण सुरू झाली होती. त्यामध्ये मुंबई, बंगळुरू, इंदूर , हैदराबाद, अहमदाबाद रूट सुरू करण्यात आले होते. महामारी नंतर देशातील सर्वच विमानसेवा स्थगित करण्यात आल्या होत्या. याचा फटका औरंगाबाद विमानतळालाही बसला. दिल्ली आणि मुंबई विमान सेवा वगळता इतर सर्व विमानसेवा स्थगित करण्यात आल्या होत्या.
दुसरी लाट ओसरल्यानंतर इंडिगोने दिल्ली, मुंबई विमानसेवा सुरू केली. त्यानंतर सहा ते आठ महिन्यांनी हैदराबाद सेवाही इंडिगोने सुरू केली होती. औरंगाबाद विमानतळ विकास करण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनीही विशेष परिश्रम घेतले. सुनील कोठारी यांनी पर्यटनाच्या संधीवरती लक्ष वेधले आणि औरंगाबाद फर्स्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही औद्योगिक दृष्ट्या औरंगाबादचे महत्त्व विमान कंपन्यांना पटवून दिले. निर्यातीची मोठी क्षमता असलेल्या या शहरात कार्गो विमानसेवा सुरू झाली पाहिजे, यासाठीची मागणी सर्वांनीच एकत्रितपणे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे लावून धरली होती. याचाच परिणाम म्हणून फ्लाय बिग या नव्या कंपनीने औरंगाबाद येथून हैदराबाद ही पहिली विमान सेवा सुरू केली आहे. लवकरच कोल्हापूर, पुणे, इंदोर जोडण्यासाठी ही कंपनी प्रयत्न करत आहे, असे कंपनीचे सीईओ संजय मांडवीया यांनी दिव्य मराठीला सांगितले.
फ्लाय बिग काय आहे
फ्लाय बिग ही नव्याने अस्तित्वात आलेली विमानसेवा कंपनी आहे. 78 ते 80 आसनक्षमता असलेली छोटी विमानं या कंपनीकडे आहेत. त्यामुळे पूर्णक्षमतेने प्रवासी वाहतूक करणे या विमानांना शक्य होणार आहे. याशिवाय देशांतर्गत विविध शहरांना या विमानसेवेचे द्वारे जोडणे हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
कोणाला होणार फायदा....
फ्लाय बिग विमानसेवा सुरू झाल्याने नोकरीनिमित्त हैदराबाद तसेच परदेशात असलेल्या आयटी सेक्टरच्याना सुविधा होईल. उद्योजकांना फायदा होणार आहे. दिल्ली आणि मुंबईच्या तुलनेत हैदराबाद येथून विविध ठिकाणची कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. औरंगाबादेतून पर्यटनानिमित्त उद्योग व्यवसायासाठी तसेच नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हैदराबादकडे उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.