आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघेही वर्गमित्र:‘नीट’ क्लासला जाताना दुचाकीला अपघात; 2 ठार ; भेंडाळा फाट्यानजीक अपघात

गंगापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

नीट क्लाससाठी औरंगाबादला निघालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भरधाव दुचाकी ट्रकला पाठीमागून धडकली. यात दोघेही जागीच ठार झाले. भेंडाळा फाट्याजवळ बुधवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. यश नयन शेंगुळे (१९) व आदित्य रामनाथ सुंब (१९) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही गंगापूर तालुक्याचे रहिवासी होते.

यश व आदित्य हे दोघे वर्गमित्र होते. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी “नीट’च्या रिपीट बॅचमध्ये तयारीसाठी त्यांनी औरंगाबादला क्लास लावला होता. पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ते दुचाकीवर (एमएच २० ईएक्स ६०४८) निघाले. सकाळी पावणेसहाच्या सुमारास औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकला (केए ५६-४१२३) पाठीमागून त्यांची दुचाकी धडकली. यात दोघांच्या डोक्यास गंभीर इजा झाली होती.

बातम्या आणखी आहेत...