आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुचाकी-बस अपघात; एक ठार

वैजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर-वैजापूर रस्त्यावरील महालगावजवळ बस व मोटारसायकलचा अपघात घडला. यात एक दुचाकीस्वार ठार, तर एक गंभीर जण जखमी झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा नांगरे (२८) असे मृताचे नाव असून कैलास सोमवते हा गंभीर जखमी झाला अाहे. दोन्ही युवक महालगाव येथील आहेत. ते महालगावाहून गंगापूरच्या दिशेने दुचाकीने (एमएच २० जी ए ४९२६) जात हाेते. दरमय्ान, गंगापूरहून वैजापूरकडे येणाऱ्या वैजापूर आगाराची बसची (एमएच ४० एन ९७३८) समोरासमोर धडक झाली.

यात दोघेही गंभीर जखमी झाले, त्यांना वीरगाव पोलिसांनी वैजापूर येथे उपचारासाठी पाठवले असता डाॅक्टरांनी तपासून कृष्णा नांगरे यास मृत घोषित केले. तर गंभीर जखमी कैलास सोमवते यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवले आहे. या घटनेची वीरगाव पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नवनाथ कदम, बीट जमादार विजय बाम्हदे, गुणवंत थोरात करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...