आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दुचाकीस्वाराने हिसकावले महिलेचे मंगळसूत्र; दांपत्य पडून जखमी

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसी वाळूज परिसरात चालत्या दुचाकीवर सोनसाखळी चोरांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. यात दुचाकी चालवणाऱ्या शिक्षिकेच्या पतीचा तोल गेला व दोघेही पडून जखमी झाले. ९ मार्चला ही घटना घडली. चिंचबन कॉलनीतील शिक्षिका स्मिता चंद्रकांत रावस ९ मार्च रोजी सायंकाळी पतीसह दुचाकीने जयभवानी चौकाकडे भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. भाजी खरेदी करून त्या जयभवानी चौक ते अल्फोसो शाळा रस्तामार्गे घरी जात असताना मागून आलेल्या दुचाकीस्वारापैकी एकाने चालत्या दुचाकीवरून हिसका देत मंगळसूत्र तोडून पोबारा केला. यात त्यांच्या पतीचा तोल गेल्याने दोघेही दुचाकीवरून पडून जखमी झाले. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेऊन त्यांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...