आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरकमहोत्सव:बायोइकॉनॉमी असेल भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा : डॉ. पांडेय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रसायनरहित व सेंद्रिय शेतीकडे जगातील देश आता लक्ष केंद्रित करताहेत. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भारतात तर ‘बायोइकॉनॉमी’ ही अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार आहे, असा विश्वास भोपाळ येथील मानसरोवर विद्यापीठाचे कुलगुरू तथा ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. अरुणकुमार पांडेय यांनी व्यक्त केला.विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या हीरकमहोत्सवानिमित्त ‘जैविक संसाधने’वर दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे शनिवारी उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. इंदूर येथील प्रा. सुदीप रॉय, उस्मानाबाद उपकेंद्राचे संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड, विभागप्रमुख डॉ. अशोक चव्हाण, संयोजन सचिव डॉ. अरविंद धाबे यांची उपस्थिती होती.

‘बायोइकॉनॉमी अँड बायोरिसाेर्सेस : द फ्यूचर ऑफ इंडियन इकॉनॉमी’वर त्यांचे बीजभाषण झाले. जैवविविधतेच्या बाबतीत श्रीमंत म्हणून आता भारताची ओळख निर्माण झाली आहे. ‘बायोबेस्ड इकॉनॉमी’ला चांगले दिवस येणार आहेत. ग्रामीण व किनारपट्टीवरील प्रदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतील,’ असेही डॉ. पांडेय यांनी म्हटले. कुलगुरूंनी अध्यखीय समारोप केला.

चार विभागप्रमुखांचा झाला सत्कार : डॉ. प्रकाश पापडीवाला, डॉ. एन. बी. वायकोस, डॉ. डी. एस. मुकादम, डॉ. दिलीप पोळवे या माजी विभागप्रमुखांचा कुलगुरूंनी गौरव केला. डॉ. धाबे यांनी विभागाविषयी माहिती दिली. सृष्टी कराळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीकांत माने यांनी आभार मानले.

राॅय यांच्या उपस्थितीत आज समारोप
रविवारी इंदूरचे वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. सुदीप रॉय, प्रा. प्रशांत गावंडे, डॉ. एम. एम. बेग आदींचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारच्या सत्रात अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...