आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीमित्र, अभ्यासकांना संधी:6 ते 8 जानेवारी दरम्यान होणार नववा पक्षी महोत्सव, सुखना प्रकल्पावर पक्षी निरीक्षण होणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एन्व्हार्यन्मेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडेमी आणि ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचालित महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ जानेवारी दरम्यान नवव्या पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड बायपास येथील महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी सभागृहात पक्षी महोत्सवाचे उद्घाटन ६ जानेवारीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते होईल. या प्रसंगी एम आय टी चे संचालक मुनीश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून तर वन आणि वन्यजीव विभागाचे डॉ. राजेंद्र नाळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.

कार्यक्रम पक्षीप्रेमींसाठी निःशुल्क आहे. मात्र, सहभागासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. शनिवारी ०७ जानेवारीला सकाळी ६ ते ९:३० या वेळेत सुखना मध्यम प्रकल्प येथे खास पक्षी निरीक्षणाचा केले जाईल. यावेळी स्थलांतरित व स्थानिक रंगीबेरंगी पक्षी बघण्याची संधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लाभणार आहे. यासाठी ERFEA यांचेकडील लांब पल्ल्याच्या दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

रविवारी ८ जानेवारी रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत जायकवाडी पक्षी अभयारण्य येथे पक्षी निरीक्षण आयोजित केले आहे. जायकवाडी येथील पक्षी निरीक्षणासाठी नोंदणी ५ जानेवारी पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे.

नोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क :

ERFEA ऑफिस- . प्लॉट नं. १२०, शास्त्रीनगर, हेडगेवार हॉस्पिटल च्या मागे, गारखेडा रोड, औरंगाबाद किंवा कुणाल विभांडीक यांना ७२७६८९५९१९ या क्रमांकावर संपर्क करावा.

या पक्षी महोत्सवासाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉ उत्तमराव काळवणे, डॉ दिलीप यार्दी, श्री अण्णा वैद्य, श्रवण परळीकर, गिरीधर पांडे, कुणाल विभांडीक यांनी केले आहे.

महोत्सवाच्या निमित्त संस्थेचे वर्षभर कार्यक्रम

  • संस्थेमार्फत पक्षी मोजणी कार्यशाळा घेण्यात येणार असून त्यानंतर जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षी गणना करण्यात येणार आहे.
  • त्याच पद्धतीने औरंगाबाद शहरातील पक्षी निरीक्षणाचे हॉटस्पॉट ठिकाणे यांवर पक्षी निरीक्षणे आयोजित करून त्यांच्या वर्षभर नोंदी घेण्यात येणार आहेत.
  • पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवण्याची कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये घरटी स्वतः बनवून निसर्गप्रेमी ती घरी नेऊ शकणार आहेत.
  • या पक्षी महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेतर्फे वन्यजीव चित्रपट सभा" सुरु करण्यात येणार आहे. त्यामार्फत महिन्यातून किमान दोन वेळा वन्यजीवांवर आधारित दुर्मिळ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...