आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षणासाठी नोंद:6 ते 8 जानेवारीदरम्यान पक्षी निरीक्षण महोत्सव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडमी आणि ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचालित महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ जानेवारीदरम्यान नवव्या पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड बायपास येथील महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी सभागृहात पक्षी महोत्सवाचे उद्घाटन ६ जानेवारीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी एमआयटीचे संचालक मुनीश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून, तर वन आणि वन्यजीव विभागाचे डॉ. राजेंद्र नाळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.

कार्यक्रम पक्षिप्रेमींसाठी निःशुल्क आहे. मात्र, सहभागासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. ७ जानेवारीला सकाळी ६ ते ९.३० या वेळेत सुखना मध्यम प्रकल्प येथे खास पक्षी निरीक्षण केले जाईल, असे डॉ. उत्तमराव काळवणे, डॉ. दिलीप यार्दी, अण्णा वैद्य म्हणाले.

पक्षी निरीक्षणासाठी नोंद ८ जानेवारी रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत जायकवाडी येथे पक्षी निरीक्षण होणार आहे. नोंदणीसाठी प्लॉट नं. १२०, शास्त्रीनगर, हेडगेवार हॉस्पिटलच्या मागे, गारखेडा रोड, औरंगाबाद किंवा कुणाल विभांडिक यांना ७२७६८९५९१९ या क्रमांकावर संपर्क करावा.

बातम्या आणखी आहेत...