आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:कोरोना नियमांचे उल्लंघन करत समाज कल्याणच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांची कार्यालयात बिर्याणी पार्टी

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भ्रष्टाचार निमुर्लन व वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्री,पालकमंत्र्याकडे तक्रार

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीडच्या समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी मंगळवारी दुपारी कार्यालयातील सहकारी व खाजगी लोकांना चक्क बिर्याणीची पार्टी दिल्याचा प्रकार समोर आला असुन या पार्टीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून निलंबन करावे अशी तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, विभागीय आयुक्तांकडे केली आहे. वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

बीडचे प्रभारी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डाॅ.सचिन मडावी यांनी मंगळवार ३० मार्च २०२१ रोजी आपला वाढदिवस समाज कल्याण विभागात साजरा केला. त्यांच्या वाढदिवसासाठी आलेल्यांना बिर्याणी पार्टी दिली असुन गर्दी जमवुन कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यासह सामाजीक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धंनजय मुंडे यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्याकडे केली आहे.तर मडावी तोंडाला मास्क न लावता, हस्तांदोलन करत, गळाभेट करत, जमावबंदीचे उल्लंघन केले व लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर पार्टी देता येणार नाही म्हणून शासकीय कार्यालयात कर्मचारीसह खासगी लोकांना बोलावून चक्क बिर्याणी पार्टी दिली व शुभेच्छांचा स्वीकार करत वाढदिवस साजरा केला आहे.मडावी यांच्यावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हासदस्य अजय सरवदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असुन कारवाई न झाल्यास लॉकडाऊनचे नियम तोडून आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...