आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय केणेकर यांची नियुक्ती:छावणीच्या निवडणुकीसाठी भाजपची 7 सदस्यांची समिती

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणूक प्रमुखपदी

राज्यातील छावणी परिषदेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर छावणी परिषदेचे निवडणूक प्रमुख म्हणून प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची नियुक्ती केली आहे. छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी सात सदस्यीय समिती नेमणार असल्याचे केणेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. समितीच्या अहवालावरून निवडणूक रणनीती आखली जाणार आहे. संबंधित सदस्यांची निवडणूक प्रमुख म्हणून आपण स्वत: निवड करणार असल्याचे केणेकर यांनी सांगितले. या निवडणुकीत युतीबाबत पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छावणी परिषदेच्या राज्यातील निवडणूक प्रमुखांमध्ये आमदार सुनील कांबळे (पुणे), आमदार सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर पुणे), संजय भेगडे (देहू), बाळासाहेब सानप (देवळाली), महेंद्र गंधे (अहमदनगर), डॉ. राजीव पोतदार (नागपूर), संजय केणेकर (छत्रपती संभाजीनगर) आदींचा समावेश आहे. छावणी परिषदेत सात प्रभाग असून मतदार संख्या १२ हजार, तर एकूण लोकसंख्या २५ हजार एवढी आहे.

राज्यात भाजपची एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती असल्याने याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचे केणेकर यांनी सांगितले. छावणी परिषदेच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि कुठल्या कामाची आवश्यकता आहे यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करून अभ्यास केला जाईल. या समितीच्या अहवालावरून निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. समिती भौगोलिक व राजकीय सर्वेक्षण करणार आहे. उमेदवार कोण असावा याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही केणेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...