आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजर कैद:आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते ताब्यात ; पोलिसांकडून नकार

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी सकाळपासून भाजप शहरप्रमुख संजय केणेकर, माजी महापौर बापू घडमोडे यांनी आंदोलन छेडले. त्यांना पोलिसांनी आपले निवेदन शांततेने मुख्यमंत्र्यांना देऊ शकता, असे सांगितले होते. तशी समजदेखील देण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी विमानतळावर त्यांचे निवेदनही स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र पदाधिकाऱ्यांनी अचानक हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर हंडे घेऊन दाखल होत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर हंडे दाखवण्याची तयारी केली. मात्र, निरीक्षक अविनाश आघाव, निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी तत्काळ धाव घेत महिलांना ताब्यात घेतले. विष्णुनगर येथील ८० वर्षीय जनाबाई मोहिते याही आंदोलनात होत्या.

सभेपूर्वी पाणीटंचाईच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा देणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनाही बुधवारी पोलिसांनी ‘नजरकैदेत’ ठेवले, असा आरोप या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नागरिकांचे प्रश्न उपस्थित करणे जर गुन्हा असेल तो आम्ही पुन्हा पुन्हा करू, असा इशारा खांबेकर यांनी दिला आहे. आपनेही अशी दडपशाही चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. दुपारी बारा वाजेपासून खांबेकर यांच्या कार्यालयाबाहेर पोलिस तैनात करण्यात आले असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे आपचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनीही पाणीप्रश्नी बुधवारी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारत त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर गाडी तैनात केली होती, असे पाटील यांचे म्हणणे आहे. भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे यांना पोलिसांनी मंगळवारी नोटीस बजावली होती. “आमच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर आहे. ही नजरकैद नाही तर काय?’ असे दांडगे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...