आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतून विजया रहाटकर यांना वगळले; ही टायपिंग मिस्टेक, सचिवपद अबाधित असल्याचा दावा

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीतून राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांना वगळले आहे. दीव-दमणच्या प्रभारीपदाची जबाबदारीही काढून घेतली आहे. विनाेद तावडे, पंकजा मुंडेंचे सचिवपद कायम राहिले आहे. पंकजांचे मध्य प्रदेश प्रभारीपद कायम असून तावडेंना हरियाणा प्रभारीपदाची जबाबदारी मिळाली. रहाटकर म्हणाल्या, ‘कार्यकारिणीत नाव नसल्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी बाेलले आहे. त्यांनी यादीत नाव नसणे ही ‘टायपिंग मिस्टेक’ असून तुमचे सचिवपद अबाधित असल्याचे मला सांगितले.

चित्रा वाघ राष्ट्रीय स्तरावर
भाजप प्रदेशच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांना नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. त्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राज्यातील ठाकरे सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरत आहेत.

वरुण-मनेका गांधी आऊट
नव्या कार्यकारिणीत मनेका गांधी आणि वरुण गांधींना संधी देण्यात आलेली नाही. वरुण यांनी शेतकरी आंदोलन व लखीमपूर हिंसाचारावरून भाजपला घरचा आहेर दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...