आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • BJP Imtiyaz Jaleel| AIMIM MP Imtiyaz Jaleel Demands FIR Against BJP Ministers Raosaheb Danve And Bhagwat Karad For Violating Covid19 Norms News And Updates

आमच्यावर गुन्हे का?:रावसाहेब दानवे, कराड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा, जनाशीर्वाद रॅलीच्या नावे मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्याचा खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 ऑगस्ट रोजी खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएम कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले होते. - Divya Marathi
15 ऑगस्ट रोजी खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएम कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले होते.

भारतीय जनता पक्ष जनाशीर्वाद रॅलीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी रोष व्यक्त केला आहे. जनाशीर्वाद रॅलीच्या नावे मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली जात आहे. कोरोना काळात नियमांची पायमल्ली केली जात आहे. सभा संमेलने भरवणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून भाजप जनाशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गोळा करत आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली. एमआयएमने निर्बंध मोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे नियम फक्त आमच्यासाठीच आहेत का असा सवालही यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

उल्लेखनीय बाब म्हणजे, स्वातंत्र्यदिनामित्त एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. औरंगाबादेतील प्रस्तावित क्रीडा विद्यापीठ मुद्दाम पुण्यात नेण्यात आले. राष्ट्रवादीच्या दबावामुळे मराठवाड्यावर अन्याय करण्यात आला असे एमआयएमने म्हटले होते. त्याचाच विरोध करत काळे झेंडे दाखवण्यात आले होते. याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 24 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी किती गर्दी जमवली त्याचे पुरावे असल्याचे खासदार जलील म्हणाले आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले, "माझ्याकडे व्हिडिओ आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे कार्यकर्ते स्वागत करताना दिसून येत आहेत. दानवेंनी मोठी गर्दी जमवली होती. तर दुसरीकडे मंत्री भागवत कराड यांच्याही जनआशीर्वाद यात्रेत मोठी गर्दी जमवल्याचे पाहायला मिळत होते." आमच्यावर पटापट गुन्हे दाखल कसे केले जातात. भाजपच्या या मंत्र्यांवर करणार नाही का? असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...