आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी नगरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भाजपचे अनेक माजी पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकाचा समावेश आहे.आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना पक्षाचे चिन्ह नसताना देखील लोक आमच्याकडे प्रवेश करत असल्याचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी यांनी सागितले.
यांचा ठाकरे गटात प्रवेश
यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका बबीता चावरिया, भाजपा माजी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, माजी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, माजी युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष अमित घनगाव, माजी मंडळ उपाध्यक्ष योगेश अष्टेकर, माजी युवा मोर्चा सदस्य अजय चावरिया, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे यांनी प्रवेश केला.
यासह भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धीवर, भाजपा मंडळ अध्यक्ष बाबासाहेब कारले, भाजपा माजी मंडळ उपाध्यक्ष बजरंग पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन खान, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष उत्तम अंभोरे यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुरुवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. विरोधकांच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात जोमाने काम करू अशी ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी दिली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, सागर शिंदे, रंगनाथ राठोड उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.