आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते किंवा इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांवर ईडी, सीबीआय कारवाई करत नाही, असे वारंवार दिसून आले आहे. त्यावरच बोट ठेवणारे बॅनर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे सचिव अक्षय पाटील यांनी क्रांती चौकात लावले आहे. भाजप नेत्यांवर किंवा इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांवर ईडी, सीबीआय कारवाई दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, अशी ऑफर त्यात आहे. यामुळे भाजप पदाधिकारी संतप्त झाले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांचे सरकार असताना सीबीआय सक्रिय होती. भाजपच्या सरकारमध्ये ईडी अधिक सक्रिय झाली आहे. रविवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. त्याविरुद्ध सोमवारी आंदोलनही झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला पाठबळ देण्यासाठी राष्ट्रवादीने बॅनर झळकवले आहे. केंद्राची दडपशाही, हुकूमशाही जनतेसमोर आणण्यासाठी बॅनर लावल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या बॅनरवर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी संतप्त आणि उपरोधिक टीका केली. आधी त्यांनी अशा बॅनरला आम्ही किंमत देत नाही, असे म्हटले. मात्र, काही क्षण थांबून त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसारख्या पक्षाला सत्तेसाठी समर्थन िदले. त्या पक्षात चोर, दरोडेखोर आहेत. भाजपमध्ये तसे कोणीही नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.