आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:पुजारी कुटुंबातील महिलांना बेदम मारहाण करणारे आरोपी अद्याप फरार, अटकेच्या मागणीसाठी भाजपकडून श्राद्ध घालून सरकारचा निषेध

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यामध्ये महिलांवरती अत्याचार खूप प्रमाणात वाढलेले आहे. यातच पुजारी कुटुंबातील दोन महिलांना त्यांच्या गुप्तांगावर बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

या संदर्भामध्ये पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. तसेच, फरार आरोपी महिलांना अटक करण्याची मागणी केली होती. परंतू, अद्यापही फरार आरोपी महिलांची अटक झालेली नाही त्यामुळे भाजपाच्या वतीने तीघाडी सरकारचे श्राद्ध घालून गृहमंत्र्यांना पोस्ट मार्फत बांगड्या पाठवण्यात आल्या. यावेळी ॲड संगीता धसे,शैलाताई मुसळे, संजीवनी राऊत, मंजुषा खाडे, गंगुबाई कुडके, जयश्री रनशिगें, पुजारी कुटुंबातील दोन महिला सदस्य होते. तसेच, विक्रांत हजारी, सर्जेराव तात्या, विलास बामणे, दत्ताभाऊ परळकर ,अमोल वडतीले, डॉक्टर लक्ष्मण जाधव, भगीरथ बियाणी ,संग्राम बांगर, कपिल सौदा, भालचंद्र कुलकर्णी, प्रकाश सोनसळे, देवकते भाऊ, गणेश भाऊआणि मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या यावेळी आघाडी सरकारचा जाहीर निषेध श्राद्ध घालून करण्यात आला.