आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड शहरातील करवाढीला विरोध:अब्दुल सत्तार यांच्या ताब्यातील नगर परिषदेविरोधात भाजपचेच 'डफडे वाजवा' आंदोलन

सिल्लोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे शिंदे गट व भाजप आज सिल्लोडमध्ये आमने-सामने आले.

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगर परिषदेविरोधात आज भाजपनेच रस्त्यावर उतरत आंदोलन केले

नगर परिषदेने केलेल्या करवाढीला भाजपने विरोध केला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज डफडे वाजवा आंदोलन केले.

करवाढ अन्यायकारक

काही दिवसांपूर्वी सिल्लोड नगर परिषदेने सिल्लोड शहरातील मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विरोध करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आठ दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये करवाढ ही जुलमी स्वरूपाची असून ती रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली होती.

तातडीने निर्णय घेण्याची मागणी

तसेच, करवाढ रद्द करण्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास 6 फेब्रुवारी रोजी डफडे वाजवा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने आज सकाळी 11 वाजता शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोरून सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डफडे वाजवा आंदोलनाला सुरुवात केली

भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते डफडे वाजवत नगरपरिषदेवर शिष्टमंडळ घेऊन गेले. यावेळी नगर परिषदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील बनकर, किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस मकरंद कोरडे, भाजयूमोचे राज्य सरचिटणीस सुनील पाटील मिरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...