आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:शिवसेनाप्रणीत शोभायात्रेचे निमंत्रण भाजपने नाकारले, महाराष्ट्राची ‘शोभा’ काढणाऱ्यांनी यात्रा काढू नये : भाजपकडून उत्तर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी शिवसेनेच्या पुढाकारातून हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे या समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कोविडमुळे दोन वर्षे यात्रेत खंड पडल्याने यंदा उत्साहात शोभायात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खैरेंनी भाजप नेत्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. भाजपने मात्र या कार्यक्रमास जाण्यास साफ शब्दांत नकार दिला आहे.

‘शिवसेनेचे ढोंगी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राची शोभा काढणाऱ्यांनी अशा ‘यात्रा’ काढू नयेत,’ असा उपरोधिक सल्ला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला आहे. खैरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन यात्रेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘ही शोभायात्रा शिवसेनेतर्फे काढण्यात येणार नसून हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपसहित सर्व हिंदूंना, संप्रदाय, संस्था, संघटना यांना देण्यात आले आहे. गोपाळ कुलकर्णी या वर्षी या समितीचे अध्यक्ष आहेत. शहागंज, गांधी पुतळा, सराफा रोड, सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर मैदान अशी ही शोभायात्रा आहे. सायंकाळी सहा वाजता शनिसाधिका विभाश्रीदीदीजी यांच्या मार्गदर्शनाने या शोभायात्रेचा समोराप करण्यात येणार आहे.’

भाजप उभारणार ३० फूट उंच गुढी
भाजपकडून शहरातील भाजपच्या प्रत्येक मंडळात ३० फूट उंच गुढी उभारण्यात येणार असल्याचे केणेकर यांनी सांगितले. भाजप आमदार अतुल सावे म्हणाले, ‘खैरेंकडून निमंत्रण मिळाले आहे. मात्र गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद‌्घाटनाचे अनेक कार्यक्रम आहेत. त्यामुळे या शोभायात्रेला जाण्यासाठी वेळ मिळणार नाही असे वाटते.

बातम्या आणखी आहेत...