आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा हल्लाबोल:उद्धव ठाकरेंवर 2 कुबड्या घेऊन सभा घेण्याची वेळ! भाषणानंतर सभास्थळी भाजपने शिंपडले गोमूत्र

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर काल पार पडली. यानंतर आज भाजपकडून मैदानावर जात गोमूत्र शिंपडत आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंना सभा घेण्यासाठी कुबड्याची गरज भासत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ऐतिहासिक छ्त्रपती संभाजीनगर मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झाली,आज ज्या मैदानावर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळावर अनेक विराट सभा घेतल्या व त्याकाळी प्रत्येक सभेतून त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गाडण्याचे आवाहन करायचे,परंतु काल जी सभा सांस्कृतिक मंडळावर झाली त्या सभेत उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोन कुबड्या घेऊन सभा घ्यावी लागली ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

सुहास दाशरथे म्हणाले की, ज्या ऐतिहासिक मैदानावर आदरणीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक विराट सभा घेत पारंपारिक विरोधक असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गाडून टाकायचे आवाहन ते त्या सभेतून नेहमी करत.

सुहास दाशरथे म्हणाले की, हिंदुत्वाची हुंकार या सांस्कृतिक मंडळावरील अनेक सभातून केली तसेच जर वेळ आली तर मी माझी दुकान बंद करेल पण या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत कधीही सत्ता स्थापन करणार नाही असे, ते सांगत यामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली त्याच ऐतिहासिक व पवित्र सांस्कृतिक मंडळावर गोमूत्र शिंपडून ते मैदान पवित्र केल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

यावेळी भाजपचे सुहास दाशरथे,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धन कराड,ॲड.अमित देशपांडे,.संजय फत्तेलष्कर,.अमोल झळके, पवन सोनवणे,.महेश मल्लेकर,.अभय मगरे, सागर विसपुते,सचिन गुगले,ऋषी काथार यांसह अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते..