आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र आव्हाड यांची प्रवृत्ती जिहादीच:भाजप प्रदेश सरचिटणीस केणेकर यांचे अंबादास दानवेंवरही टीकास्त्र

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत. लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेशी जवळीक असलेल्या सोहराबुद्दीनचे गोडवे गाण्यात एकेकाळी ते पुढे होते. मुळात आव्हाड हे जिहादी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी शुक्रवारी भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

केणेकर म्हणाले, की छत्रपती संभाजी महाराजांना हालअपेष्टा करून मारणारे औरंगजेब आव्हाड राष्ट्रवादी आणि आव्हाड यांना क्रूर वाटत नसतील. उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला असे उद्गार काढले. वध हा वाईट प्रवृत्तींचा केला जातो याचे दानवे यांना भान असायला हवे. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्याने त्यांच्या बुद्धीचे दिवाळे निघाल्याची टीका केणेकर यांनी केली. या वेळी वक्फ बोर्डाचे हनीफ अली, हज कमिटीचे एजाज देशमुख, सलीम शेख, सय्यद सलीम आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...