आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठका:भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे घेणार आज पाच बैठका

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २३ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पाच बैठका, एक दुचाकी रॅली निघणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांच्यासह विविध समाजाच्या प्रभावी पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही बावनकुळे सदिच्छा भेट देणार आहेत.

सकाळी ९ वाजता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. ११ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, समर्थनगर ते संत एकनाथ रंगमंदिर दुचाकी रॅलीत सहभागी होतील. ११ वाजता संत एकनाथ रंगमंदिरात शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुखांची तर ३ वाजता आयएमए हाॅलमध्ये जिल्हा कोअर समिती, ४ वाजता सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील.

बातम्या आणखी आहेत...