आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कभी खुशी कभी गम:करदात्यांना दिलासा दिल्याने भाजपचे कार्यकर्ते आनंदित, उत्पन्नच नाही तर सवलतीचा काय उपयोग, विरोधकांचा सवाल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या मतांची मोठी भिस्त असलेले मध्यमवर्गीय, लघु व मध्यम उद्योजक यांच्यासाठी दिलासा देण्यात आल्याने सत्ताधारी भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते तर रोजगार, उत्पन्न घटल्याने ही सवलत काय कामाची, असे प्रश्न उपस्थित करीत विरोधी पक्षांनी यावर टीका केली.

करदात्यांना दिलासा हे निवडणुकीचे लक्ष्य ^ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देण्यात आला आहे. तरुणांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे, पण प्रशिक्षित झाल्यावर त्यांनी जायचे कुठे याचे उत्तर देण्यात आलेले नाही. किती रोजगार पुरवला जाणार यावर चुप्पी बाळगणारे हे बजेट फसवे आहे. - इम्तियाज जलील, खासदार

सामान्यांचे उत्पन्न घटले, करसवलतीचा काय फायदा? ^गेल्या दोन वर्षांपासून सामान्यांचे उत्पन्न घटले आहे. करसवलत वाढवून उपयोग काय? राज्यातील रेल्वे प्रकल्पांकडे कानाडोळा केला आहे. मराठवाड्याच्या पदरी निराशा पडली आहे. महागाई, बेरोजगारी रोखण्यासाठी काहीही जाहीर केले नाही. - चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते

महिलांचा सन्मान वाढवणारे ^स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात महिला सन्मान बचत पत्र जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत महिला व मुलींच्या नावावर २ लाख रुपये जमा करता येतील. त्यात ७.७५ टक्के व्याज मिळणार आहे. महिला बचत गटांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. मध्यमवर्गीयांसाठी हा क्रांतिकारी अर्थसंकल्प आहे. - विजया रहाटकर, राष्ट्रीय सचिव, भाजप

निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प ^राज्यात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सवंग घोषणा असलेला सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणारी घोषणा टिकाऊ नाही शेतकऱ्यांच्या स्टार्टअपला प्राधान्य दिले, रेल्वेसाठी २.४० कोटींची तरतूद, पण त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला किती हे कळले नाही रोजगार वृद्धीसाठी ठोस उपाययोजना नाही. - आ. सतीश चव्हाण, राष्ट्रवादी

सामान्यांना दिलासा देणारा ^तरुणांच्या रोजगारासाठी यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. मोबाइल-टीव्ही स्वस्त, तर सोने-चांदी महाग होणार असल्याने सामान्यांच्या हितासाठीचे हे बजेट आहे.- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना

सामान्यांची दिशाभूल करणारा ^मुंबईतून देशाला सर्वाधिक कर, पण महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत स्थान नाही वर्षाला २ कोटी रोजगार देणार होते त्याचा उल्लेख नाही. युवक-महिलांची निराशा करणारा. - जितेंद्र देहाडे, सरचिटणीस, काँग्रेस

विकासाला चालना देणारा ^कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण, रोजगार, निर्मिती व कामगार कल्याण या सर्व घटकांना न्याय देणारा. मध्यमवर्गीयांना दिलेली कर सवलत एेतिहासिक निर्णय ठरणार आहे. पोषक धान्याचे उत्पादक, त्याला भाव, त्याची निर्यात या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून आखलेला अर्थसंकल्प आहे.

- संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस, भाजप शेतकरी, महिला व युवकांची दिशाभूल करणारे ^महागाई रोखण्यासाठी यात ठोस उपाययोजना नाहीत. महिला वित्तमंत्र्यांनी हे सादर केले, पण महिलांचे शिक्षण, सुरक्षा व रोजगार यासाठी काहीही तरतूद नाही. शेतकरी, महिला व सुशिक्षित बेरोजगार यांची दिशाभूल करणारे बजेट आहे. - दीपाली मिसाळ, जिल्हा महासचिव, काँग्रेस

वाढपी आपला असून काय फायदा?, फक्त घोषणाच ^वाढपी आपला असला की पंगतीमधील लोकांची विशेष सोय असते. मात्र तसे झाले नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आपल्या शहराचे असून काहीही फायदा झाला नाही. ना राज्याला, ना मराठवाड्याला. आतापर्यंत फक्त स्वप्नं दाखवण्यात आली. -किशनचंद तनवाणी, जिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव गट

समाजातील सर्व घटकांना बळ देणारा अर्थसंकल्प ^शेतकरी, युवक, उद्योजक, गरीब, मध्यमवर्गीय, महिला अशा सर्व समाजघटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारा आहे. अंत्योदयाच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या माणसाची काळजी घेणारा आहे. - शिरीष बोराळकर, भाजप शहराध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...