आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तशीरपणा:पूर्वी तासभर चालणारे भाजपचे आंदोलन 20 मिनिटांत संपले,नव्या शहराध्यक्षांचा वक्तशीरपणा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • , आंदोलनाच्या विषयाचाही परिणाम

महाविकास आघाडी सरकार असताना भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वात होणारी आंदोलने किमान तासभर चालत होती. पण नवे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (११ नोव्हेंबर) झालेले आंदोलन २० मिनिटांमध्येच संपले. कर्नाटकातील काँग्रेसचे नेते जारकीहोली यांनी हिंदूंविषयी, राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होते. केेणेकरांनी मविआविरुद्ध अडीच वर्षात किमान १० धरणे आंदोलने, निदर्शने केली. ते सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यासाठी आग्रही असायचे. त्यांना रोखणाऱ्या पोलिसांंसोबत त्यांची धुमश्चक्री होत असे. घोषणाबाजी, गाडीत कोंबणे यात बऱ्याच वेळा अर्धा तास जात होता. पण शुक्रवारी नवे अध्यक्ष बोराळकर नियोजित वेळीच क्रांती चौकात दाखल झाले. जारकीहोलींचा प्रतीकात्मक पुतळा जाळल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केला. राज्यात सत्तांतरामुळे सरकारविरोधी घोषणाबाजी नव्हती. त्यातही कर्नाटकातील काँग्रेस नेत्याचा विषय कार्यकर्त्यांना अतिपरिचित नव्हता. त्याचाही परिणाम जाणवला. दरम्यान, उद्धवसेनेचे हिंदुत्व ढोंगी, दुटप्पी आणि सत्तेचे लोभी असल्याचा आरोप बोराळकरांनी केला. सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींसोबत उद्धवसेनेचे नेते पदयात्रेत चालूच कसे शकतात, असा सवालही त्यांनी केला. या वेळी दिलीप थोरात, समीर राजूरकर, राजू शिंदे, लता दलाल, जालिंदर शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...