आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:रेमडेसिविरचा काळाबाजार; दोन इंजेक्शन 10 हजार 800 रुपयांत विकले, मेडिकल चालक ताब्यात

बीड9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड शहर ठाण्यात तक्रार दाखल करताच मेडिकल चालक ताब्यात, चौकशी सुरू

शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा अधिक पैसे उकळून रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री केल्याचा प्रकार बीड शहरातील बसस्थानकासमोरील लाइफलाइन रुग्णालयाशी संलग्न असलेल्या लाइफलाइन औषधी दुकानात गुरुवारी (दि.१५) रात्री नऊ वाजता उघडकीस आला. रुग्णाच्या नातेवाइकाने विक्रेत्यास बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन करत तक्रार दिली असुन पोलिस या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करणार आहेत.

बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांचे नातेवाईक हे बीड शहरातील संजिवणी हॉस्पीटलमध्ये १४ एप्रील २०२१ पासुन कोरोनामुळे आजारी असुन तेथील डॉ. संकेत बाहेती यांनी संतोष सोहनी यांना गुरूवारी रूग्णाला देण्यासाठी रेमडेसिविरची दोन इंजेक्शन आणण्यास सांगितले. तेंव्हा सोहनी हे डॉक्टरांचे पत्र घेवुन बीड शहरातील बसस्थानकासमोरील लाईफ लाईन मेडिकल येथे गेले. तेव्हा त्यांनी मेडीकल मधुन दोन इंजेक्शन खरेदी केले. एमआरपीनुसार दोन इंजेक्शनचे प्रत्येकी ५४०० रुपयांप्रमाणे विक्रेत्याने १० हजार ८०० रुपये बिल आकारले. तेंव्हा सोहनी यांनी दुकानदारास सदरील इंजेक्शनची एवढी किंमत नसतांना माझ्याकडून जास्तीचे पैसे का घेता अशी विचारणा केली तेंव्हा मेडीकल चालकाने तुम्हाला सदरील इंजेक्शन घ्यायचे असेल तर घ्या या किंमतीत सुध्दा इंजेक्शन तुम्हाला मिळणार नाही.तेंव्हा सोहनी यांनी पावतीची मागणी केली असता पावती भेटत नाही. असे मेडीकल चालकाने सांगीतले.प्रत्यक्षात शासनाने रेमडेसिविरला १४०० रुपयांची मर्यादा घालून दिलेली आहे. मूळ किमतीपेक्षा आठ हजार रुपये अधिक घेतल्याने संतोष सोहनी यांनी बीड शहर पोलिसांत तक्रार दिली असुन या प्रकरणी सहायक निरीक्षक मुस्ताफा शेख व उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे यांनी चौकशी सुरू केली आहे.

तीन दिवसापासंुन इंजेक्शन पाहिजे होते
बीड शहरात सध्या रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीतुन सर्व सामान्यांची लुट केली जात आहे. माझे नातेवाईक कोरोनाबाधीत असल्याने मागील तिन दिवसांपासुन रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती. तरीही बीड शहरात सदरील इंजेक्शन मिळाले नाहीत. बीडचे औषध निरीक्षक डोईफोडे यांची मी भेट घेतली त्यांच्याकडे सदरील इंजेक्शनची मागणी केली त्यांनी सदरील मेडीकलवरून इंजेक्शन घ्यावे असे मला सांगीतले शेवटी मी लाईफलाईन हाॅस्पीटलमधील मेडीकलवर जावुन दोन इंजेक्शन घेतले.त्यांनतर पोलिसात तक्रार दिली आहे.
संतोष सोहनी, जिल्हा कार्यायध्यक्ष , व्यापारी महासंघ

बातम्या आणखी आहेत...