आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेच्या अंघोळीचा व्हिडीओ काढत केले ब्लॅकमेल:व्हिडीओच्या नावाने अत्याचार करणाऱ्या मीस्त्रीला 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विवाहीतेचा आंघोळ करतांनाचा व्हिडीओ काढल्यानंतर तिला ब्लॅकमेल करुन तिच्‍यावर एका मिस्‍त्रीने बलात्‍कार केला. विशेष म्हणजे विवाहीतेने त्‍या नराधमाचा व्हिडीओ काढलेला मोबाइल पाण्‍यात टाकला होता, मोबाइल खराब झाल्याचे समजून पीडितेने त्‍याच्‍याशी बोलणे बंद केल्याने त्‍या नराधमाने ते व्हिडीओ विवाहीतेच्‍या पतीसह इतर नोतवाईकांच्‍या मोबाइलवर सेंट केला. हा प्रकार केल्याची घटना 2 ऑगस्‍ट रोजी उघडकीस आला आहे.

प्रकरणात पोलिसांनी तपास करुन नराधम मिस्‍त्री भानूदास किसन घोडे (40, रा. प्‍लाट क्रं. 24, सर्वे नं. 34/1, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) याला बुधवारी दि.३ ऑगस्‍ट रोजी पहाटे अटक केली. त्‍याला 6 ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एम. बोहरा यांनी दिले.

प्रकरणात 25 वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्‍यानूसार, पीडित विवाहीता पती व दोन मुलांसह मातीकाम करुन आपला उदर्निर्वाह चालवते. पीडितेचा पती हा काही वर्षांपूर्वी आरोपी भानुदास घोडे याच्‍याकडे कामात होते, त्‍यामुळे पीडिता त्‍याला चार वर्षांपासून ओळखते. गेल्या तीन वर्षांपूर्वी पीडिता ही आंघोळ करित असतांना आरोपी घोडे याने त्‍याच्‍या मोबाइलमध्‍ये तिचा व्हिडीओ काढला होता. त्‍यानंतर आरोपीने पीडितेला तो व्हिडीओ पती व नातेवाईकांना पाठविण्‍याची धमकी देत पीडितेकडे शारीरीक सुखाची मागणी केली.

घटनेच्‍या आठ ते दहा दिवसांनी आरोपीने पीडितेला दुचाकीवर वेरुळ येथील एका लॉजवर नेत बालत्‍कार केला. संबंध घेतांना व्हिडीओ देखील आरोपीने काढला. त्‍यानंतर आरोपीने तिच्‍यावर दोनवेळा वेरुळ लॉजवर बलात्‍कार केला. व याबाबत कोणाला काही सांगितल्या पती व मुलांना जीवे मारण्‍याची धमकी दिली. मागच्‍या जून महिन्‍यात आरोपीने पीडितेला जयभवानी चौकातील एका लॉजवर नेत बलात्‍कार केला होते, त्‍यावेळी पीडितेने त्‍याचा मोबाइल बाथरुमधील पाण्‍याने भरलेल्या बकेटीत टाकला होता. मोबाइल खराब झाला असेल असा विचार करुन पीडितेने आरोपीशी बोलणे बंद केले होते. 27 जुलै रोजी दुपारी सव्‍वाबारा वाजेच्‍या सुमारास पीडिता मुलाला शाळेत आणण्‍यासाठी जात असतांना झेंडाचौकात आरोपी भेटला त्‍याने पीडितेला व्हिडीओ व फोटो पती व नातेवाईकांना पाठविण्‍याची धमकी दिली. मात्र पीडितेने त्‍याकडे दुर्लक्ष केले. 2 ऑगस्‍ट रोजी आरोपीने पीडितेचे व्हिडीओ आणि फोटो पीडितेच्‍या पती आणि नातेवाईकांच्‍या मोबाइल सेंट केले. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपीने आणखी कोणत्‍या लॉजवर नेवून पीडित विवाहीतेवर बलात्‍कार केला, आरोपीला गुन्‍ह्यात कोणी मदत केली काय, गुन्‍हा करतेवेळी आरोपीने परिधान केलेले कपडे आणि वापरलेला मोबाइल हस्‍तगत करायचे आहेत. आरोपीची वैद्यकिय तपासणी करायची असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...