आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भागात:रामकृष्ण मिशनतर्फे 595 गरजवंतांना ब्लँकेट वाटप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह ग्रामीण भागातील निराधार, गरजवंतांना ब्लँकेटची गरज पडत असल्याने रामकृष्ण मिशन आश्रमाच्या वतीने ५९५ जणांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भागात असलेल्या ५९५ निराधारांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यात सांजखेडा, विजयपूर, शेवता, अमरापूर-वाघुडी, जळगाव, पिंपळगाव -पांढरी, लोहगाव, लामगव्हाण, घारदोन, आपतगाव, चिंचोली, माळीवाडा आदी ठिकाणी स्वामी चेतनात्मानंद व स्वामी परामृतानंद यांच्या हस्ते ब्लँकेट दिले. या वेळी स्वयंसेवक संजय गुंडेवार, किरण कुलकर्णी, दिलीप गौडर आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...