आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMAUमध्ये नवा अभ्यासक्रम:विदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘डिप्लोमा इन हिंदी फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स’; इंग्रजीतून हिंदी शिकवणार

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागाने यंदापासून एक अनोखा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. ‘डिप्लोमा इन हिंदी फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स’ असे कोर्सचे नाव असून भारतात शिक्षणासाठी आलेल्या विदेशी विद्यार्थ्यांसाठीच हा कोर्स आहे. एक वर्ष आणि दोन सत्राच्या या अभ्यासक्रमाच्या सोमवार ते शुक्रवार दररोज दोन तासिका होतील. शंभर टक्के रोजगार देणाऱ्या ‘हिंदी अनुवाद’ या पदविकेला मात्र भारतीय विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर दहा वर्षांनी म्हणजेच 1968 दरम्यान हिंदी विभागाची स्थापना करण्यात आली होती. आता विभागाला 54 वर्ष पूर्ण झाले आहेत. या विभागाने अनेक हिंदी साहित्यिक दिले आहेत. आत्तापर्यंत 495 विद्यार्थ्यांनी पी.एचडी. तर 426 जणांनी एमफिल केले आहे. म्हणजेच 921 जणांनी हिंदी साहित्य, हिंदी नाटक, काव्यात संशोधन केले आहे. ऐवढी समृद्ध परंपरा असलेल्या या विभागाने या शैक्षणिक वर्षांपासून ‘विदेशी विद्यार्थ्यांसाठी हिंदी पदविका’ असा कोर्स सुरू केला आहे. बारावी किंवा समकक्ष उत्तीर्णांसाठी दोन सत्रांचा हा 30 प्रवेशक्षमता असलेला कोर्स आहे. विशेष म्हणजे, इंग्रजीतून हिंदी शिकवले जाणार असून ऑक्टोबरपासून तासिका सुरू होणार आहेत. शंभर टक्के रोजगारभिमुख असलेल्या ‘हिंदी अनुवाद’ या कोर्सचे हे विसावे वर्ष आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक विभागात ‘हिंदी ऑफिसर’ अशी एक जागा असते. त्यासाठी हा कोर्स करणे अनिवार्य आहे. 40 प्रवेशक्षमतेच्या या कोर्सचे अध्यापन सुटीच्या दिवशी अर्थात शनिवार, रविवारी सायंकाळी केले जाईल. त्यामुळे शासकीय, खासगी सेवेतील पदवीधर चाकरमान्यांना नक्कीच प्रवेश घेता येईल. पदविकेत साहित्यिक, शासकीय, पत्रकारिता आणि सिनेमासाठी आवश्यक असलेल्या अनुवादाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे शासकीय, खासगी सेवेतील पदवीधर चाकरमान्यांना नक्कीच प्रवेश घेता येईल. इच्छुकांनी www.bamu.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.

आरजेचा कोर्स सुरू करणार-

हिंदी विभागप्रमुख डॉ. भारती गोरे म्हणाल्या की, पुढील वर्षीपासून आरजे अर्थात रेडिओ जॉकीचा कोर्स सुरू करणार आहोत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. अभ्यासक्रम संरचनेची प्रक्रिया दिवाळीनंतर पूर्ण केली जाईल. विद्यार्थ्यांच्या फक्त हिंदी भाषेवरच नव्हे तर मराठी, इंग्रजी भाषांवरही संस्कार करण्याचे काम आरजे कोर्स करणार आहे. सिनेमा, हिंदी पत्रकारिता, हिंदी साहित्याची रूची वाढवणारा हा कोर्स असणार आहे. दोन वर्षांच्या एम.ए. अभ्यासक्रमातही मोठे फेरबदल केले आहेत. फक्त हिंदी साहित्य नव्हे तर आता कोशल्यावर अधारित व रोजगारभिमूख एमएचा कोर्स केला आहे. -,

विभागाचे यशोशिखर :

  • नेट-81,
  • सेट-63,
  • एमफिल-426,
  • पीएचडी-495,
  • ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ)-14,
  • सूवर्णपदक प्राप्त विद्यार्थी-16
बातम्या आणखी आहेत...