आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तीस हजाराची लाच घेतांना कळमनुरीच्या मंडळ अधिकाऱ्यास रंगहाथ पकडले

हिंगोली9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कळमनुरी मंडळामध्ये वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टवर कारवाई न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. ८) दुपारी साडेचार वाजता कळमनुरी येथील बसस्थानका समोर रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी मंडळातील काही गावांमधून वाळूची वाहतुक केली जात आहे. सध्या वाळू घाटाचा लिलाव नसतांनाही वाळूची वाहतुक होत आहेत. मात्र या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे याने तक्रारदारास ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते. मात्र तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार दिली. या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली.

दरम्यान,आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कळमनुरी येथील नवीन बसस्थानका समोर लाचलुचतचे उपाधिक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफुणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुभाष आढाव, बुरकुले, अभिमन्यु कांदे, विजयकुमार उपरे, प्रमोद थोरात, अवी किर्तनकार, विनोद देशमुख, संतोष दुमाने, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, तानाजी मुंडे यांच्या पथकाने सापळा रचला होता. त्यानंतर साडेचार वाजता तक्रारदाराकडून मंडळ अधिकारी डाखोरेे याने ३० हजार रुपयाची लाच घेताच त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...