आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना बळी:'माझ्या वाघासारख्या भावाला कोरोनाने हिरावलं'; अंगरक्षकाच्या निधनाने पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

परळी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याचे समजताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हळहळल्या. गोविंद मुंडे यांच्या कुटुंबाला व्हिडीओ काॅल करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

परळी जवळील कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले गोविंद मुंडे (वय 40) हे पंकजा मुंडे यांचे 2009 पासून अंगरक्षक होते. मागील आठवड्य़ात ते कोरोना पाॅझेटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर परळीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना लातूर येथे हलवण्यात आले. गोविंदची तब्येत सुधारावी ते यातून सुखरूपपणे बाहेर यावेत यासाठी पंकजा मुंडे दररोज डाॅक्टर, रूग्णालयातील यंत्रणा आणि त्याच्या कुटूंबियांशी बोलत होत्या. गोविंद यांना वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतू बुधवारी मध्यरात्री गोविंज यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

गोविंद मुंडे यांच्या निधनाबद्दल पंकजा मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. ''माझ्या परिवारातील एका तरूण, मेहनती व धाडसी सदस्य आपण गमावला आहे, त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो'' अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...